राजर्षी शाहू महाराज मार्गावर (१०० फुटी रस्ता ) १००|१२५ गाळेधारकांचे विविध छोटे मोठे व्यवसाय आहेत. हे गाळे गाळेधारकांच्या मालकीचे आहेत काहींचे सातबारावर नावेही आहेत. महापालिकेचे सर्व कर हे गाळेधारक भरतात या व्यवसायवरच गाळेधारकांचा उदर निर्वाह व पोटपाणी चालते गेल्या आठवड्यात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकीने अतिक्रमण नोटीसा दिल्या आहेत. त्या संदर्भात गाळधारकांची १ जुलै २०२५ रोजी भाजपाच्या वतीने #मा_शहाजी_भोसले_मा_अमर_पडळकर_मा_राजु_नलवडे_मा_सुमित_शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी माजी आमदार #नितीनराजे_शिंदे यांनी गाळेधारकांना मार्गदर्शन केले आणि सकारात्मक चर्चा झाली होती तसेच ६ जुलै रोजी कार्यसम्राट #आमदार_सुधीरदादा_गाडगीळ यांना ही या संदर्भात गाळेधारकांच्या वतीने मा अमर पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मी या संदर्भात महापालिका आयुक्त व प्रशासनाशी बोलतो असा शब्द गाळेधारकांना दिला
याच मागणी संदर्भात आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी भाजपच्या नेत्या #अॅड_स्वातीताई_शिंदे, प्रभाग क्रमांक १८ चे #भाजपाचे_मा_शहाजी_भोसले, जिल्हा उपाध्यक्ष #मा_अमर_पडळकर_मा_राजु_नलवडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका #आयुक्त_मा_सत्यम_गांधी यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्ताशी सकारात्मक चर्चा झाली गाळेधारकांनी जे काही तात्पुरते पाऊस, उन्हाळा साठी अतिक्रमण केलेले असेल ते आम्ही स्वःत काढून घेतो असा शब्द दिला आहे आयुक्तांनी ही या संदर्भात मी माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले
यावेळी वरद पडळकर, कुमार यादव, संदिप सव्वाशे, शांतीकुमार देसाई, सोहेल दर्यावर्दी, अरूण चव्हाण, जमीर शेख, नसरूद्दीन नदाफ, हुसेन खलीफा व इतर गाळेधारक उपस्थित होते