*_सांगली वार्ताहर :_*
_वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायरनमेंट प्रोटेक्शन कमिशन दिल्ली या सामाजिक संस्थेमार्फत श्रीयुत चंद्रकांत कडोले यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले._
_दिनांक 28 जून 2025 रोजी दिल्ली येथील शहा ऑडिटोरियम मध्ये घेण्यात आलेल्या पदवीदान समारंभात प्रसिद्ध बॉलीवूड स्टार बिंदू दारासिंग यांच्या हस्ते ही पदवी देण्यात आली._
_वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायरनमेंट प्रोटेक्शन कमिशन ही दिल्ली येथील रजिस्टर एनजीओ असून जगभरातील 150 देशांमध्ये यांचे सामाजिक कार्य सुरू असते. विविध सेक्टर मधील जीवनात अनन्य साधारण कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे सन्मानित करत असतात._
_श्रीयुत चंद्रकांत कडोले यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून एम कॉम परीक्षेत द्वितीय रँक मिळवून डी आय टी परीक्षेत गोल्ड मेडल मिळवले आहे. गेल्या 35 वर्षापासून तासगाव मिरज येथे एमपीज् गायडन्स फॉर अकाउंटन्सी व स्टॅटिस्टिक चे क्लासेस मार्फत 9000 पेक्षा जास्त कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यादरम्यान शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण प्रदान केले आहे._
_श्रीयुत कडोले सर यांचे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र व कर्नाटकात चार्टर्ड अकाउंटंट ची परीक्षा उत्तीर्ण झाले असून 300 पेक्षा जास्त विद्यार्थी बँक मॅनेजर टॅक्स कन्सल्टंट वकील बनले आहेत._
_डॉक्टर चंद्रकांत कडोले सर यांनी आज अखेर सरांनी बरेच ब्लड डोनेशन कॅम्प हेल्थ चेकअप कॅम्प चे नियोजन केले असून वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा ते अकाउंट विषयांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करत असतात. या मानद डॉक्टरेट पदवीमुळे सरांचे विविध स्तरावरती अभिनंदन होत आहे._