जाणून घ्या एसटी बदद्ल आपले महत्व व अधिकार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2023 12:44 PM

 एसटीचा प्रवास होणार अधिक सुखद; महामंडळाचा मोठा निर्णय राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी अस्वच्छ असल्यास त्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर निश्चित करून प्रतिबस पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पाच महिने उलटल्याने आता बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.

एसटी आगार म्हणजेच एसटी स्टँड व प्रवासी वाहतूक एसटी अस्वच्छ व थुकने, धूळ माती, कचरा असल्यास नागरिक तक्रार करू शकतात नक्की सर्व वाचा व आपले हक्क व अधिकार जाणून घ्या
🙏🏻कारण ज्या ठिकाणी एसटी स्टँड व एसटी मध्ये हजारो लोक रोज येतात व जातात त्या लोकांच्या मध्ये काही सशक्त व निरोगी, आजारी, कुष्ठ रोगी, टीबी, सवसर्ग जन्य आजार असणारी वेक्ती असे विविध लोक बस मध्ये व स्थानकावर प्रवास करत असतात एसटी बस स्थानक व एसटी बस स्वच्छ व निरोगी व निर्जंतुकरण केलेली असणे आवश्यक आहे एसटी बस निर्जंतुकिरण असले बाबत वाहन चालक व कडेकटर कडे एसटी निर्जंतुकिरण प्रमाणपत्र नागरिक मागू शकतात व विचारणा करू शकतात .
त्याच प्रमाणे इतर नागरिकांना जसे RTO कडून ज्यादा प्रवासी वाहतूक बाबत दण्डत्मक पावती केली जाते त्याच प्रमाणे एसटी बस परमिट प्रमाणे वाहतूक केली जाते का व ज्यादा परमिट पेक्षा व वाहतूक वरती RTO ऑफिस कडून दण्डत्मक कार्यवाही केली का व एसटी वेळेवर पासिंग व फिटनेस वेवस्थित आहे का का फक्त रंग रंगोटी करून चालवली जात आहे किंवा नाही कारण आपण ज्या एसटी मधून प्रवास करतो ती सुस्थितीत असणे तितकेच आवश्यक आहे काहीवेळा एसटी सुस्थितीत नसते त्यामुळे कधी कधी नागरिकांच्या जीवावर ही बेतू शकते त्यामुळे नागरीकांनी एसटी बद्दल जागरूक व सतर्क असणे आवश्यक आहे कारण कधी केव्हा कोणती घटना घडेल याच नेम नाही सध्या ज्यादातर एसटी प्याच वर्क, जागो जागी पत्र्यांचे तुकडे, वेल्डिंग जागो जागी दिसतात करू दे त्यास काही अडचण नाही मात्र एसटी ही सुस्थितीत असणे आवश्यक आहे व एसटी मधील पत्रा, बॉडी, काचा इतक्या एकेकवेळी वाजतात की प्रवाशी करणाऱ्या लोकांच्या कंटाळा बसतात व सपेन्शन नसल्याने अंगदुखी ला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एसटी फिटनेस वेवस्थित व परमिट प्रमाणे प्रवासी वाहतूक असणे तितकेच आवश्यक आहे तसेच एसटीच्या स्वच्छतेसाठी वारंवार लेखी सूचना देऊनदेखील कार्यवाही होत नसल्याने थेट आगार व्यवस्थापकावर गाड्यांच्या अस्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची असणार आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी बस तपासणीसाठी मुख्यालयाकडून साठ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाला महिन्यातून १५ बसची तपासणी करून त्यांना गुण द्यावे लागणार आहेत. कमी गुण असलेल्या बसच्या आगार व्यवस्थापकाला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल.
 या तपासणीची माहिती आगार व्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभागप्रमुखांना देण्याच्या सूचना मुख्यालयात केल्या आहेत.
• बसची स्वच्छता करणे, बसच्या आतील केरकचरा साफ करणे. बसचे दरवाजे आतून व बाहेरून धुऊन व पुसून स्वच्छ करने व बसच्या आतील / बाहेरील सर्व अनधिकृत स्टिकर्स/ पोस्टर्स हटवणे बसमधील आसनांची स्वच्छता बसमधील सर्व खिडक्या स्वच्छ करणे / स्वच्छ ठेवणे. चालक केबिन व डॅशबोर्ड कपड्याने पुसून स्वच्छ करणे.
प्रवासी सामान (लगेज) बुथ पाण्याने धुऊन स्वच्छ करणे.चालकासमोरील काच आतून-बाहेरून स्वच्छ करणे.बसच्या मागील काच आतून-बाहेरून स्वच्छ करणे.बसला गंतव्य स्थानाचा सुस्पष्ट फलक असणे आवश्यक आहे 

एसटी बद्दल व अस्वच्छ बद्दल काही तक्रारी व समस्या असतील तर आगार प्रमुख व व्यवस्थापक किंवा
👉मा.ना. श्री.एकनाथ शिंदे 
मा.मुख्यमंत्री ( परिवहन ) महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, म.रा.मा.प.महामंडळ यांचे कडे तक्रार करू शकता.
👉

Share

Other News

ताज्या बातम्या