मुलचेरा शहरात रॅलीतुन स्वच्छता जनजागृति व श्रमदान,स्वच्छता पंधरवाडा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 02/10/2023 3:27 PM


गडचिरोली : जिल्ह्यातील नगर पंचायत मूलचेरा अंतर्गत स्वच्छता ही सेवा,स्वच्छता पंधरवडा,तसेच माझी वसुंधरा अभियान,मेरी माटी मेरा देश,एक तारीख एक तास एक साथ श्रमदान अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅली ला हिरवी झेंडी नगराध्यक्ष विकास नैताम यांनी दाखवली.
       सदर रॅली शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा मूलचेरा येथून मेन चौक मूलचेरा, बुद्ध विहार,जय सेवा चौक,नगरपंचायत कार्यालय मुलचेरा,राणी दुर्गावती चौक ते सम्पूर्ण शहरात फिरवून शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा मूलचेरा येथे रॅली चा समारोप करण्यात आला. रैलीतुन स्वछतेविषयी तसेच अमृत कलश यात्रेविषयी जनजागृति करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या