भगूर :- जगातील सर्वश्रेष्ठ महिला राज्यकर्त्या, हिंदू धर्म रक्षिणी, शूर व लोक कल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भगूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यासपीठावर झालेले या जयंती उत्सव प्रसंगी धनगर समाजाच्या सौ. सुशीला चंद्रशेखर ओहोळ यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी सौ.अंजली मरकड सौ. मनीषा जोरे सौ. प्रतिमा शिदगुडे सौ.आगोने इत्यादी महिला तसेच सर्वश्री कचरू मरकड,पांडुरंग ओहोळ, राजेंद्र गोपाळ ओहोळ, मंगेश मरकड, सुनील जोरे, विशाल ओहोळ, राकेश शिदगुडे, बंटी ओहोळ, श्री. आगोने, श्री. राजेंद्र गावडे शुभम जोरे व फोटोग्राफर संस्कार मरकड इत्यादी धनगर समाजाचे कार्यकर्ते पूजनासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. प्रसाद आडके भगूर देवळाली मंडल अध्यक्ष भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच याप्रसंगी भाजपाचे उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पंकज शेलार पर्यावरण जिल्हा अध्यक्ष तानाजी भोर निलेश हासे, मधुकर कापसे, शिवाजी आव्हाड, प्रताप गायकवाड, , दिलीप वालझाडे शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, नितीन करंजकर योगेश बुरके, कैलास भोर, प्रशांत लोया, श्याम देशमुख विलास कासार श्री. बुरके प्रवीण वाघ सुनील वालझाडे इत्यादी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.