*भगूरला भाजपाच्या वतीने लष्कर सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा संपन्न.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 30/05/2025 11:44 PM

*भगूरला भाजपाच्या वतीने लष्कर सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा संपन्न.

 :- भाजप देवळाली- भगूर मंडल यांच्या वतीने भगूर येथील आज शुक्रवार दिनांक ३० रोजी. सकाळी १० वा. लष्कर सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत आपल्या भारताच्या शूर वीर जवानांनी दहशतवाद्यांवर घातक प्रहार करत देशाच्या सुरक्षेसाठी गौरवशाली कामगिरी केली. त्यांच्या सन्मानार्थ भगूर मध्ये या तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या तिरंगा यात्रेस सुरुवात झाली. या तिरंगा यात्रेमध्ये उघड्या जीपमध्ये भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित असलेल्या नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान,छत्रपती शिवाजी महाराज की जय हो,देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, भगूर पुत्र तात्याराव सावरकरांचा विजय असो असा जे घोष करत ही तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मारवाडी गल्ली मार्गे स्वातंत्र वीर सावरकर स्मारक मार्गे तेली गल्ली, मुंजा बाबा चौक, वंजार गल्ली, मेन रोड, गायकवाड गल्ली, करंजकर गल्ली, क्रांती चौक मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर माजी सैनिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. आणि तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रांत अध्यक्ष- एकनाथराव शेटे,भाजपाचे माजी सैनिक आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष- दिनकर पवार यांच्यासह माजी सैनिक अरुण गव्हाणे, सदाशिव सांबरे, रामदास गोडसे, रोहिदास सोनवणे, गुरुदास पाटोळे, मिलिंद जोशी, अमोल मेहतर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष- सुनील बच्छाव, पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष -तानाजी भोर, भाजप नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद कासार, देवळाली- भगूर मंडल अध्यक्ष -प्रसाद आडके, भाजपा उद्योग आघाडी उपजिल्हा अध्यक्ष पंकज शेलार भाजप महिला आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष- कविता पाळदे, भाजप देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष- बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, भगूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष- रोहिणी गायकवाड, भगूर नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष दीपक बलकवडे, माजी नगरसेवक उत्तम आहेर, भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष- खंडेराव गायकवाड, दादासाहेब देशमुख, अंबादास पाटील, नारायण आडके, शिवाजी घोरपडे,रमेश पवार, मधुकर कापसे, प्रताप गायकवाड,,युनुसू शेख,डॉ. मृत्युंजय कापसे, अमोद शहाणे, सुनील गायधनी, चेतन बागडे, शेखर कस्तुरे,विजय कुकरेजा, संदीप शेटे, निलेश हासे, प्रमोद शेटे, सुनील जाधव, नारायण गायकवाड, आदित्य केळकर, प्रकाश कर्डिले, रोशन चौधरी, हिरामण आडके, प्रमोद घुमरे, विक्रम सोनवणे आदींनासह भगूर देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील माजी सैनिक , भाजप व शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांसह नागरिक या तिरंगा यात्रा प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या