संमत्ती शिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास परवानगी देऊ नये, नागरिक जाग्रती मंचकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2025 3:57 PM

प्रति 
मा. जिल्हाधिकारी 
सांगली जिल्हा 

विषय :- सांगली जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने, फसवणुकीने, खोटे  नाटे सांगून , आज्ञानाचा गैरफायदा घेऊन स्मार्ट मीटर बसवले जात आहे त्याला पायबंद घालण्याबाबत 

महोदय 

सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून प्रीपेड स्मार्ट मीटर ला विरोध आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली नंतर पाशवी बहुमत मिळाल्यानंतर जबरदस्तीने , फसवणुकीने, घरातील वयस्कर पुरुष व महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खोटे नाटे सांगून परस्पर स्मार्ट मीटर बसवले जात आहेत स्मार्ट मीटर बसवले जात आहेत 
अपार्टमेंट मध्ये तर ग्राहकांना कळतच नाही आपले मीटर कधी बदलून गेले आहेत 
लोकांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहेत व त्यांना एका महिन्याची बिले आले आहेत त्यामध्ये तीन ते चार पटीने बिले वाढवून आल्यामुळे मिरज तालुक्यातील बुधगाव व बिसूर मध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे रोजच्या रोज स्थानिक वृत्तपत्रातून समाज माध्यमातून स्मार्ट मीटर बाबत विरोध होत असताना महावितरण व महावितरण नेमलेल्या खाजगी ठेकेदाराकडून गुंडागिरी करून जबरदस्ती करून मीटर बसवण्याचे काम चालू आहे 
याबाबत काल मीटर चोरीची तक्रार द्यायला गेल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये त्या ग्राहकाची तक्रार नोंद करून घेण्यात आली नाही 
मग त्या ग्राहकाने कायदा हातात घ्यायचा का हा खरा प्रश्न आहे 
आत्ता एका ठिकाणाहून मला फोन आला त्या महिलेला खोटे सांगून मीटर बसवण्यात आले आहे व तिच्यावर हात टाकण्याचा प्रसंग घडला असे त्यांचे म्हणणे आहे 
अजून काय काय बघायला लागणार आहे हे परमेश्वराला माहित 
या माध्यमातून आमची आपणास विनंती आहे जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून आपण याबाबत तात्काळ कारवाई करून ज्यांची संमती नाही अशा ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत त्यांना मज्जाव करण्यात यावा व त्याबाबत लेखी आदेश काढण्यात यावे अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास जिल्हा प्रशासन व महावितरण जबाबदार राहील 

सतीश साखळकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, महेश खराडे, रुपेश मोकाशी, आसिफ बावा, रजाक नाईक, युसुफ उर्फ लालू मिस्त्री, मयूर बांगर, अवधूत गवळी, आनंद देसाई,

सर्व पक्ष कृती समिती सांगली जिल्हा 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

10) मा. आमदार रोहित पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या