कुपवाड : प्रतिनिधी
कृष्णा व्हँली चेंबर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक कचरा गोळा संकलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार, एन.एन. कुलकर्णी, उद्योगांचे प्रतिनिधी, चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार यांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित कर्मचार्यांना प्लास्टिक चे दुष्परिणाम काय आहेत याबाबत माहिती दिली. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी आणि ऱ्हास कसा होत आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की सर्वांनी प्लास्टिक मुक्तीची सुरवात आपल्या घरातून केली तर निर्माण होणारा कचरा कमी होईल. सर्वांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवी वापरण्याबाबत आवाहन केले.
सदर कार्यक्रमामध्ये ओद्योगिक वाहसातीमधील उमेद सायझर्स, जेसन फौंड्री, सुयश कास्टिंग, बाश्को इंजिनिअरिंग, विरेशा कास्टिंग, मेनन पिस्टन, शाह प्रेसिकास्ट, स्वीट कन्फेशनरी, सांगली अँल्युमिनियम आदी कंपन्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.