सामाजिक उपक्रम व गरजूंना मदतीचा हात व उपेक्षितांना मदत करून स्वच्छता पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस साजरा
नाशिक प्रतिनिधी
राज्याचे संकट मोचन मा.मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता वाढदिवस अनाथ आश्रम गोरगरिबांची मदत करून व वृक्षारोपण जाहिराती होर्डिंग बॅनर्स पोस्टर्स अथवा अनावश्यक खर्च टाळावा समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या विधायक उपक्रमाद्वारे हा दिवस साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त करत तसेच रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर स्वच्छता अभियान गरजूंना अन्नधान्य वाटप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रुग्णांना मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सेवा करण्यात यावी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हाच खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साजरा केल्यासारखे होईल असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले याच अनुषंगाने भाजपा जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज शेलार यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रम अनाथ आश्रमामध्ये सहकुटुंब सहित गरजूंना शालेय साहित्य तसेच भोजन व्यवस्था वृक्षरोपण असे विविध उपक्रम राबवून सहकुटुंबासहित वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रतीक राजपूत व अमित भाऊ जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आश्रमातील बालगोपालांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून शेलार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.