आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने अत्यंत थाटामाटा मध्ये पक्षी संग्रहालय सुरू केले होते आज सहज त्या भागातून जाताना पक्षांचा आवाज ऐकायचा म्हणून गेलो मात्र त्या ठिकाणी गाढवांचे मोठे संग्रहालय दिसून आले मग गाढवांचाच आवाज ऐकून आलो...
तसेच त्या ठिकाणी जे मोठे पिंजरे उभा करण्यात आले आहेत त्यात टाकाऊ पदार्थ आणि भंगाराचे साहित्याचे संग्रहालय हा अभिनव उपक्रम जणूकाही महापालिकेने राबवण्यात आला आहे असे दिसून आले..
गाढव संग्रहालय व टाकाउ व भंगार यांचे अनोखे संग्रहालय उभा करण्यात आल्याबद्दल महापालिकेचे शतशः आभार....
सतिश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली