कुपवाड शहरात जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठया उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/05/2026 6:28 PM

   स्व. मदनभाऊ पाटील स्टेडियम, कुपवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास खेळाडू, क्रीडाप्रेमी व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाभावना, शिस्त व संघभावना वाढीस लागण्यास निश्चितच मदत होणार आहे.
उद्घाटन समारंभास जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, उपमहापौर गजानन मगदूम, प्रा. जहांगीर तांबोळी, हर्षकुमार पाचोरे, दादासो पाटील, भाऊसाहेब पाटील, देवेंद्र पाटील, हणमंत सरगर, सी. आर. पाटील, राजू पाटील, मैनाबापू, आशुतोष धोतरे, संदीप भोसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशन व शिवप्रेमी मंडळ, कुपवाड यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी जयश्री वहिनी पाटील, उपमहापौर गजानन मगदूम व पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या