नांदेडमध्ये 'शिवम् सुंदरम् अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'चा भव्य उद्घाटन सोहळा; माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार शुभारंभ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/05/2026 7:45 PM

​नांदेड :- नांदेडकरांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात एक नवे पाऊल टाकण्यासाठी 'शिवम् सुंदरम् अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. नांदेड' चा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा येत्या १९ मे २०२६, रोज मंगळवार, सायंकाळी ५:३० वाजता पावडेवाडी नाका येथील सोसायटीच्या मुख्य कार्यालयात संपन्न होणार आहे.
​या पतसंस्थेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार श्री.अशोकराव शंकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या यावेळी मा.श्री.हेमंत पाटील (आमदार, विधान परिषद)
​श्री.डी.पी.सावंत,श्री. अमरनाथ राजूरकर (भा.ज.पा. महानगराध्यक्ष, नांदेड),
​श्री.बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर विधानसभा)​ श्रीजयाताई चव्हाण (आमदार, भोकर विधानसभा)​श्री.आनंद शंकरराव बोंढारकर (आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा),​सौ. कविता संतोष मुळे (महापौर, म.न.पा. नांदेड),​सौ.विश्रांती माधव कदम (नगराध्यक्ष, मुदखेड),​श्री. वीरेंद्रसिंग गाडीवाले (सभापती स्थायी समिती, म.न.पा. नांदेड),​श्री.किशोर स्वामी (नगरसेवक, म.न.पा. नांदेड),​श्री. प्रशांत अण्णा तिडके (नगरसेवक, म.न.पा. नांदेड),​सौ. सदिच्छा सोनी पाटील (सभापती, महिला व बालकल्याण विभाग, म.न.पा. नांदेड),​सौ.संगीता विठ्ठल पाटील डक (माजी सभापती,नांदेड),सौ.वैशाली मिलिंद देशमुख (नगरसेवक, म.न.पा. नांदेड),श्री. गिरीष जाधव (अध्यक्ष, शाकुंतल स्कुल फॉर एक्सिलन्स)
​श्री.जगदीश पाटील भोसीकर (सभापती, कृ.उ.बा. समिती, भोकर),​श्री.धनंजय तांबेकर (अध्यक्ष, नांदेड जिल्हा पगारदार व नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, नांदेड),श्री. संभाजी सुर्यवंशी (महासचिव, नांदेड जिल्हा पगारदार व नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित,नांदेड)यांची उपस्थीती लाभणार आहे.
​'शिवम् सुंदरम् अर्बन' पतसंस्थेच्या माध्यमातून नागरिकांना आधुनिक बँकिंग सेवा आणि आर्थिक स्थैर्य देण्याचा मानस संस्थेचा आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आणि नवीन वाटचालीस प्रेरणा देण्यासाठी सर्व हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किशोर बालाजीराव गोरटकर पाटील, श्री माधव पाटील कदम आणि सर्व शिवम् सुंदरम् अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या