सांगली : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या व पुणे येथे सुरू असलेल्या १५ वर्षाखालील महिला राज्य क्रिकेट स्पर्धे मध्ये सांगली च्या संघाने दैदीप्यमान कामगिरी बजावली आहे
सांगली विरुद्ध सोलापूर या झालेल्या सामान्य मध्ये सांगली संघाने १२६ धावांनी विजय मिळवला
या एकतर्फी विजयामध्ये
पिहू शाहने तूफानी फलंदाजी करत अवघ्या ९७ चेंडूत २६ चौकारांच्या मदतीने नाबाद १३२ धावांची खेळी केली तिला शुभ्रा पवार हिची ५४ धावांची हक्कम साथ मिळाल्या मुळे संघाची धावसंख्या २५३ पर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली
तसेच एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याऱ्या सोलापूर संघाच्या फलंदाज यांची समृद्धी गुंधळ, स्नेहल पवार आणि अदिती साळुंखे यांनी प्रत्येकी २ बळी घेत सोलापूरच्या फलंदाजीला खिंडार पाडत सोलापूर संघास १२७ धावांवर रोखले.
सांगली जिल्हा क्रिकेट संघातील या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार व सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज साहेब व राज्य टूरनामेंट कमिटी सदस्य मा.निलेश शहा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.