खासदार विशाल पाटील यांची मनपात विरोधी पक्षनेते व काँग्रेस नगरसेवकांची भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/05/2026 6:27 PM

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांची आणि विरोधी पक्ष नेते श्री. मंगेश चव्हाण यांची भेट घेत सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल खासदार विशाल पाटील यांनी यावेळी आभार मानले. समवेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. राजेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. भेटीदरम्यान तिन्ही शहरातील विविध प्रभागांतील नागरिकांच्या समस्या, विकासकामांतील अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न याबाबत नागरसेवकांशी सविस्तर चर्चा झाली. 

सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घ्या, त्या पोटतिडकीने सोडवा आणि एखाद्या बाबीमध्ये कोणतीही अडचण आल्यास तत्पर रहा अशा सूचना यावेळी खासदारांनी सर्वांना केल्या. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांशी कायम जोडलेले राहून विकासकामांना गती देणे आवश्यक असते. नागरिकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करा, समस्येच्या मुळापर्यंत जावा व अडचणी निकाली काढा यात माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या