भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड करून पक्षाने श्री प्रकाश ढंग यांनी केलेल्या कार्याची जणु पोचपावतीच दिली. आज माननीय मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झालेबद्दल मा प्रकाश ढंग यांचे अभिनंदन करीत सत्कार केला आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याबद्दल प्रकाश ढंग यांनी आभार मानले आणि आणखी जोमाने तसेच समर्पणाने पक्षाचे काम करून जिल्ह्यात भाजपा संघटन आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपचा झेंडा फडकविण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सर्वांना आदरणीय मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश भाऊ खाडे, आ.सुधीर गाडगीळ, आ.गोपीचंद पडळकर, आ.सत्यजित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सौ. नीताताई केळकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. शेखर इनामदार, भाजपा ज्येष्ठ नेते दिपक बाबा शिंदे म्हैशाळकर, प्रदेश भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज ( भैय्या) पवार, भाजपा सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.सम्राट महाडीक, खासदार श्री. धनंजय महाडीक तथा इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.