भगूर शहर शिंदे सेनेच्या वतीने शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांच्या हस्ते भगूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांचे स्वागत केले

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/05/2025 5:46 PM


भगूर शहर शिंदे सेनेच्या वतीने शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांच्या हस्ते भगूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांचे स्वागत केले .भगूर शहराच्या विविध विकासकामान बाबत मुख्याधिकारी व शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांची झाली चर्चा

भगूर वार्ताहर:-भगूर शहर शिंदे सेनेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांच्या हस्ते भगूर नगरपालिकेचा नव्याने नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्याधिकारी सचिन पटेल यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भगूर शहराच्या विविध विकासकामान बाबत मुख्याधिकारी व शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांच्यासह सोनवणे यांच्या सोबत केलेल्या लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळासह मुख्याधिकारी यांची चर्चा झाली गेल्या पाच वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक राजवट असल्याने लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांचे नगरपालिकेत येणे जाणे कमी झाले आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील समस्या या नगरसेवकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची भगूर ही नगरी नाशिक जिल्ह्यात नव्हे तर भारत देशात राजकीय दृष्ट्या जागरूक असलेले शहर म्हणून ओळखले जाते. प्रशासन राजवट असल्यामुळे प्रशासनाने भगुर शहरातील विकास कामांकडे लक्ष द्यावे तसेच नागरिकांना येणाऱ्या समस्या तात्काळ सोडाव्यात व पुढील काळात मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजना भगूर शहरात राबवून भगुर् शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर राहावे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील मित्र मंडळाने मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.यावेळी माजी नगरसेवक अंबादास कस्तुरे,संजय शिंदे,सुदाम वालझाडे,नंदू धात्रक,नितीन करंजकर, प्रमोद घुमरे,शाम ढगे,राजेंद्र जाधव,फरीद शेख,पांडुरंग आंबेकर,बाळासाहेब कुटे, पंकज कापसे,पांडुरंग कस्तुरे आदींसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिका अधिकारी सोमनाथ देवकाते,हांडोरे आदी उपलब्ध होते.

कोट...
लोकप्रतिनिधी नसल्याने झाली गैरसोय गेल्या पाच वर्षापासून भगूर नगरपालिकेत प्रशासक राजवट असल्याने नागरिकांना आपल्या समस्या सांगता येत नाही त्यामुळे नागरिकांसाठी असलेल्या अत्यावश्यक सुविधा त्यांना मिळत नाही राज्य शासनाने लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा 
विक्रम सोनवणे 
भगुर शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख

Share

Other News

ताज्या बातम्या