सिव्हील ते गारपीर पर्यंतचे अतिक्रमण आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थीतीत जमीनदोस्त

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/05/2025 1:56 PM

सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवर महापालिकेची अतिक्रमन मोहीम - अतिक्रमित कट्टे, बोर्ड, शेड महापालिकेकडून जमीनदोस्त : आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जोरदार मोहीम

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवरील अतिक्रमने आज आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्तितीत जमीनदोस्त करण्यात आली. सिव्हिल चौकापासून ते गारपीर रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला असणारी विक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिकेने हटवीत रस्ता मोकळा केला.

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल च्या बाहेरील मुख्य रस्त्यावर दुतरफा व्यवसायिकानी रस्त्यावर फलक, शेड, कट्टे उभारुन अतिक्रमन केले होते. यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. याचबरोबर 
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकाना सुद्धा अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांनी सुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आज खुद्द आयुक्त सत्यम गांधी यांनी रस्त्यावर उतरत अतिक्रमणावर हातोडा मारला. उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, प्रज्ञा त्रिभुवन, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, अतिक्रमण कार्य अधिकारी दिलीप घोरपडे यांच्यासह टीमने ही कारवाई केली.

Share

Other News

ताज्या बातम्या