महानगरपालिकेची रस्यांबाबत प्रचंड उदासीनता, नागरिक त्रस्त : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/05/2025 8:15 PM

* *मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची रस्त्यांबाबत असणारी उदासीनता  महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. कारण सांगलीतील हळद भवन समोरील बोळात रस्त्यावरच भले मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी पाणी साठवून सदर पाणी शेजारी घरांमध्ये फिरत आहे शिवाय या ठिकाणी या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. तर मिरज सांगली रोड वरून क्रीडा संकुल ला जाणाऱ्या बायपास रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हा रस्ता धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक आणि क्रीडा संकुल ला जाणारे खेळाडू यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने आयुक्त सत्यम गांधी यांनी याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी*                                         


  *कळावे*               
मनोज भिसे 
अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या