शक्तीपीठ महामार्ग , संवादासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना लावले पळवून...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/05/2025 8:07 PM

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत.  शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाद दुत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज दि. २३ व दि. २४ मे रोजी जिल्ह्यातील   १८ गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे. पण आज कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत आप आपल्या गावातुन अक्षरशः पळवून लावले. व कोणताही संवाद न करता अधिकार्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.
कोणाचेतरी स्वप्न पुर्ण करण्याकरिता सरकार शक्तीपीठचा घाट घालत असेल तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. हे शेतकऱ्यांनी दाखवुन दिले आहे. 
शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. म्हणुन आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही. आमची लढाई आमच्या गावात आणी शेतात राहील. त्याचा पहीला हिसका आज गावात आलेल्या अधिकार्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे.

उमेश देशमुख, सतिश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे ,सुनिल पवार, सुधाकर पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या