सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कर्मचारी शामराव नगर मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. ड्रेनेजमध्ये साठलेले सांडपाणी खोदलेल्या गटारी मध्ये अनेक दिवसापासून सोडत आहेत. शामराव नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गटारीत सोडलेले ड्रेनेजचे पाणी साचून राहिल्याने गंभीर स्वरूपात परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी साठलेले सांडपाणी बाहेर जाण्यास कोणताही मार्ग नाही. आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ निचरा पाण्यासाठीच अभियान शामराव नगर नागरिकांसाठी धोक्याचे वाटते. तरी लवकरच महानगरपालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून शामराव नगर वाशी यांना सुख-समृद्धीचे जीवन जगण्याची संधी लवकरच उपलब्ध करून द्यावी अशी नम्र विनंती.
*शैलेश पवार,
सामाजिक कार्यकर्ते, सांगली