आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
शिंदी खुर्द गावात फुलाचे काम चालू असून रस्ता खचल्यामुळे पुढे दहिवडी कोळकजाई बुधला जाणारा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे
दहिवडी दि: दहिवडी कुळकजाई पुढे राजापूर बुध
जाणाऱ्या रस्ता शिंदी खुर्द नजीक ओढ्यावर चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटला काढून दिलेला सर्विस रोड वाहून गेला असल्यामुळे दहिवडी कुळकजाई जाणारी वाहतूक बंद करण्यात आले आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार खाडे व साबळे यांनी त्याठिकाणी तत्पर जाऊन पाहणी करत रस्ता वाहतूक साठी बंद केला. माण तालुक्यात गेल्या चार-पाच दिवस झाले सलग सतत धार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी ओढून आले भरून वाहू लागले आहे. कुळकजाई जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील शिंदी खुर्द मधील ओढ्याला आज सकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने रस्त्यावरील पूलाच्या काम चालू असून साईटला काढून दिलेला रस्ता वाहू लागल्याने तत्पर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे आपल्या सोयीनुसार योग्य त्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे दहिवडी कुळकजाई बूध जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे वरील जवळपास अनेक गावांचा संपर्क ह्या रस्त्याशी येत असून संबंधित ठेकेदार यांनी तातडीने रस्तावरील असणाऱ्या पुलाचे काम करून रस्ता चालू करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.