आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*- पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा दिनांक : पाटण मतदारसंघातील रस्ते वन विभागाच्या अंतर्गत येत आहेत, वन विभागाने तातडीने प्रस्ताव मंजूर करावेत आणि वन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांनी पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ यशनी नागराजन, उपवनरक्षक अदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटण प्रादेशिक अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह उपस्थित होते.
वन विभागातील रस्त्यांचा प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत.…