सांगलीच्या विविध प्रशांबाबत मुख्यमंत्र्यांनी उदयाच्या दौऱ्यात हमी द्यावी : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/05/2025 3:49 PM

प्रति 
मा. नाम. देवेंद्रजी फडणवीस 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

विषय :- आमच्या सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत 

महोदय 

आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सांगली येत आहात त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 

सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेतच मात्र सामाजिक संस्था संघटना म्हणून आम्ही सुद्धा काही गोष्टींचा पाठपुरावा करत असतो म्हणून हा पत्र प्रपंच 
उद्या आपला धावता कमी वेळाचा सांगलीचा दौरा आहे त्यात आम्हाला आपल्याला भेटायला मिळेल असे वाटत नाही म्हणून समाज माध्यमातून वृत्तपत्रातून आपल्याशी संवाद साधण्याचा व आमच्या मागण्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 

1) अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत काल मंत्रालय स्तरावर व्यापक मीटिंग झाली आहे त्याबाबत ठोस निर्णय घेऊन महापुराच्या समस्यातून आम्हाला कायमस्वरूपी सुटका करून देण्याबाबत प्रयत्न करावेत
2) 45 फूट ते 50 फूट पाण्याची पातळी वाढल्यानंतर सांगली शहराचा संपर्क इतर शहरांशी तुटतो त्याबाबत योग्य त्या उपाययोजना राबवून 60 फूट पाणी आले तरी शहराशी संपर्क तुटता कामा नये याबाबत 2019 पासून केलेल्या मागण्या बाबत ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत याबाबत तातडीने आपण आदेश द्यावेत
3) राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात उडान योजनेअंतर्गत विमानतळ विकसित केली जात आहेत मात्र 1965 पासून आमच्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील विमानतळ धावपट्टी वाढवून विकसित करण्याबाबत उदासीनता दिसत आहे याबाबत आपण तात्काळ कारवाई करावी 

4) सांगली शहराच्या पाचीला पुजलेला शेरी नाला प्रश्न अजूनही भिजत पडलेला आहे त्याबाबतचा 102 कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन प्रशासन स्तरावर प्रलंबित आहे त्याबाबत तातडीने तरतूद करून सदर प्रस्ताव मंजूर करावा 

5) सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पाणीपुरवठा योजना बाबत वारणा उद्भव योजना राबवण्याचा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न चाललेला आहे तो थांबवावा 
कारण एकदा का वारणा उद्भव योजना मंजूर झाली तर भविष्यात सांगली आणि कुपवाड शहरासाठी नव्याने पाणी पुरवठा योजना राबवली जाणार नाही त्यासाठी सध्याची आहे ती यंत्रणा सक्षम करणे व दीर्घकालीन उपाय योजना साठी थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याबाबत प्रशासनाला आदेश देणे 
6) 2018 ला आपण मुख्यमंत्री असताना जे एन पे टी झालेला करार त्यानुसार ड्रायपोर्ट आज पर्यंत झाले नाही त्याबाबत आपण ड्रायपोर्ट  बाबत परत एकदा प्रयत्न करून सांगली जिल्हा ड्रायपोर्ट द्यावा 

7) सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही नवीन मोठा उद्योग आलेला नसल्यामुळे जिल्हा मागासलेला आहे त्यासाठी आपल्या स्तरावरून एखादा मोठा उद्योग सांगली जिल्ह्याला द्यावा 
(दावस मध्ये झालेल्या करारानुसार)

8) आमच्या सांगली जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम मंडळाचे स्वतंत्र मंडल कार्यालय (ए सी ऑफिस) तात्काळ मंजूर करण्यात यावे 

9) मेट्रो शहरानंतर राज्यातील इतर शहरात आयटी पार्क विस्तारित करण्यात येणार आहेत त्यातील आमच्या सांगली जिल्ह्याला आयटी पार्क साठी प्रयत्न करून मोठ्या आयटी कंपन्या आणाव्यात 

10) आमच्या सांगली जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही सांगली जिल्ह्यातून युतीला पाच आमदार मिळालेले आहेत तरी आमच्या सांगली जिल्ह्याला स्थानिक मंत्रीपद द्यावे

11) शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र काम सुरू करावे तसेच कृषी विद्यापीठ आमच्या सांगली जिल्ह्यासाठी तात्काळ मंजूर करण्यात यावे 

अजून बऱ्याचशा मागण्या आहेत तरी आत्ता वरील मागण्या बाबत आपण उद्याच्या दौऱ्या त घोषणा कराव्यात अशी समस्त सांगली करांच्या वतीने आपणास विनंती आहे.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या