सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील प्रवासी संघटना, सल्लागार समिती सदस्य व नागरिकांनी केली होती. यासाठी अनेक स्तरातून पाठपुरवठा केला जात होता. 5 जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करावी.अशी मागणी करण्यात आली होती. कोल्हापूरहून शक्य नसेल तर मिरज मधून सुरू करण्यात यावी. ते ही शक्य नसेल तर मिरज कुर्डूवाडी डेमु एक्सप्रेसचा कलबुर्गी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
याच मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून येणाऱ्या पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रामध्ये 01 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 च्या दरम्यान गाडी क्र.01107/08 मिरज कलबुर्गी मिरज स्पेशल ICF 14 डब्याची अशी गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मिरज येथुन पहाटे 5 वाजता निघेल व कलबुर्गी येथे दुपारी 01:30 वा.पोहचेल परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथुन दुपारी 03:30 वा.सुटेल व मिरज येथे रात्री 11:50 वा.पोहचेल.
या गाडीस आरग,बेळंकी,सलगरे,कवठेमंहकाळ,लंगारपेठ,ढालगाव,जतरोड,म्हसोबाडोगंर,जावले,वासुद,सांगोला,पंढरपुर ,मोडलिंब कुर्डुवाडी,माढा,मोहोळ,सोलापुर, अक्कलकोट,दुधनी,गाणगापुर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
हि गाडी सुरु झाल्यानंतर पंढरपुरच्या पाडुंरंग बरोबर सोलापूर चे सिद्धेश्वर,तुळजाभवानी अक्कलकोट चे स्वामी समर्थ तसेच गाणगापूर चे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे.
तरी ही गाडी फक्त आषाढी स्पेशल साठी न चालवता ती कायमस्वरूपी चालवण्यात यावी व या गाडीस देवदर्शन एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे. अशी मागणी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत,रेल्वे प्रवासी संस्था चे कार्याध्यक्ष संदीप शिंदे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,वाय सी कुलकर्णी पंडितराव कराडे (तात्या) सोपान भोरावत,मधुकर साळुंखे,पाडुंरंग लोहार,कुंदन भोरावत यांनी केली आहे.