सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेला हजारो झाडे आहेत. त्यापैकी अनेक झाडे ही रस्त्यावर झुकली असून त्यांच्या फांद्या वाहतुकीस धोकादायक आणि अडथळा ठरत आहेत त्यामुळे अशी धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्या महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तोडाव्यात अशी मागणी लोकहित मंचेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.
सदर धोकादायक झाडे ही सिव्हिल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस युनियन बँकेपासून जाणारा रस्ता,कुलकर्णी लॅब समोर, तसेच सिविल हॉस्पिटल रोड ते स्टॅन्ड रोड, विश्रामबाग परिसर, राजमती भवन परिसर, बापट मळा परिसर आधी परिसरामध्ये अशी धोकादायक झाडे आहेत.सदरच्या रोडवरती मोठ्या प्रमाणात झाडे आहेत सदर रोड वरती मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांची वर्दळ असते काही झाडे पूर्णपणे पडण्याच्या अवस्थेत आहेत शिवाय काही झाडे वाळलेली आहेत. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या झाडांच्या फांद्या लवकरात लवकर काढण्यात याव्यात. अशी मागणी ही भिसे यांनी केली आहे.