मा सत्यम गांधी आयुक्त यांनी बाजार परवाना विभागास दिल्या आदेशानुसार आज
बाजार व परवाना विभागाच्या वतीने सहा.आयुक्त डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड व्यापारी संघटने च्या पदाधिकारी सदस्य यांच्यासोबत व्यवसायधारक यांनी परवाना घेण्याबाबत आवाहन व मार्गदर्शनपर बैठक पार पडली आहे.
कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री बिरू आस्की,अमर दिडवल,राजेंद्र पवार,अनिल कवठेकर यांच्यासह कुपवाड भागातील १५० व्यापारी या बैठकीस उपस्थितीत होते.व्यवसायधारक यांना व्यवसाय परवाना घेण्याबाबत आवाहन करण्यात आले,
महापालिका क्षेत्रात व्यवसाय परवाना घेऊन व्यवसाय करणे कायद्याने बंधनकारक आहे, व्यवसायधारकानी परवाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन वतीने नियोजन करण्यात येत आहे.
व्यवसायधारकानी योग्य कागदपत्रे दाखल करून परवाना मागणी करून सहकार्य करावे असे अहवान करण्यात आले आहे,
व्यापारी संघटनेच्या वतीने काही अडचणी या वेळी मांडण्यात आला आहेत .
व्यवसाय परवाना शुल्क कमी करावे ,
व्यापाऱ्यांना सेवा सुविधा पुरवावीत ,
रस्त्यावरील विक्रेत्यांची समस्या सोडवावी , व्यापाऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली आहे,
सदरच्या समस्या तात्काळ निकाली होण्याच्या दृष्टीने प्रयन्त करण्यात येणार आहे.
मा.आयुक्तासो यांच्या मार्गदर्शनाने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणेबाबत आश्वासन देण्यात आले.
विनापरवाना व्यवसाय धारकावर कारवाई करण्यात येत आहे, तरी व्यवसाय धारकांनी व्यवसाय परवाने घेऊन व्यवसाय करावा असे या वेळी सूचित करण्यात आले आहे.
बाजार व परवाना सहा.आयुक्त. प्रज्ञा त्रिभुवन,सहा.आयुक्त
श्री.सचिन सागावकार,
स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, प्र.अधिक्षक. श्रीमती.विद्या सानप, स्व.निरीक्षक.सिद्धांत ठोकळे,विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे,लिपिक प्रज्ञावंत कांबळे या वेळी उपस्थितीत होते ,