मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा नाम देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात एक माहिती देत आहेत व महावितरणचे अधिकारी कर्मचारी सांगली जिल्ह्यात तसेच आदानी ग्रुपचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना उद्धट बोलून दाब देऊन मीटर रीडिंग येणार नाही आवरेज रीडिंग बिल देणार असे म्हणून ब्लॅकमेलिंग करत आहेत.
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे त्यांनी महाराष्ट्रात सर्व विभागांना लेखी आदेश काढावे स्मार्ट मीटर बाबत सक्ती नाही म्हणून तसेच जुन्या मीटर चे रीडिंग घेण्यासाठी पूर्वी प्रमाणे रीडिंग घ्यायला महावितरणचे कर्मचारी पाठवावे.
तसेच ज्यांची जुनी मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ती सुद्धा तात्काळ बदलून मिळावीत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा