आटपाडी, करगणी येथील पिडीता अत्याचार प्रकरणी विधानसभेत आवाज उठवण्याची लोकहित मंचने केली मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/07/2025 7:19 AM

     आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील मुली वरील लैंगिक अत्याचार व तिच्या आत्महत्ये संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष  तथा आमदार इद्रिस भाई नायकवडी  आणि ज्येष्ठ आमदार अरुण अण्णा लाड यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी,  अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची मागणी लोकहित मंच सांगलीच्या वतीने केली.यावेळी दोघाही आमदारांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या