तात्याराव सावरकर आजही काळ्यापाण्याची शिक्षा भोगताय
भगूर गावात येणाऱ्या रस्त्यावरचे साठलेले पणी काढायची जबाबदारी भगुर नगरपालिकेने घेतली पाहिजे ते नाही जमले तर नगरपालिकेला टाळे लावून ती जबाबदारी आमच्यावर सोपवावी आम्ही स्वखर्चाने ते काम करुन घेऊ— प्रेरणा बलकवडे
रेल्वे प्रशासनाने फक्त आतील बोघद्याचे काम केले त्यातून पाणी पाझरते पुढे सार्वजनीक बाधकाम विभागातील निधीने एक बाजुने रोड व ड्रेनेज भगूर नगरपालिकेने केले.
दुसऱ्या बाजुने बोगध्याचे काम आतिक्रमणामुळे बंद होते.
हे आतिक्रमण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी काढून नागरिकांच्या सोयी साठी कच्चा रस्ता स्वखर्चाने तयार करुन दिला. त्यानंतर आमदार सरोज ताई आहिरे यांच्या निधितून ट्रिमीक्स टकून रस्ता पक्का करण्यात आला.
ह्या बागध्याचे काम मुळात रेल्वे प्रशासनाने चुकिचे केले आहे यात पाणि पाझरते त्याला बाहेर पडायला ड्रेनेज सिसटीम केलेले नाही. नगरपालिकेने रोडला जे ड्रेनेज केले त्याची उंची चुकली असुन त्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही.
ह्या प्रश्नाची जबाबदारी आज कोणीच घ्यायला तयार नाही.ह्या कामाची चौकशी होण्याची मागणी प्रेरण बलकवडे यांनी केली असून नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळा होईपर्यंत हे पाणी काढायची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी अन्यथा नगरपालिकेला टाळा लावून ती जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ असे प्रेरणा बलकवडे यांनी पत्रा द्वारे सांगितले.