.अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय, मुंबई या संस्थेमार्फत नुकत्याच पार पडलेल्या प्रारंभिक शास्त्रीय हार्मोनियम संगीत परीक्षेमध्ये अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड(सांगली) संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेच्या 9 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये कु. स्वरा रवींद्र पाटील, कु. स्वानंदी नितीन माने यांनी विशेष प्राविण्य तर कु. सृष्टी रवींद्र पाटील, कु. आर्या अविनाश बुरुटे, कृष्णा राजु सोनी, अकिल गैबिसाब मुल्ला हे प्रथम श्रेणी व संस्कृती दिलीप पाटील, सार्थक विद्यासागर नरदेकर, अजहर अब्दुलरौफ शेख यांनी द्वितीय श्रेणीत गुण मिळवून यश संपादित केले.
या परीक्षेची तयारी शाळेचे संगीत अध्यापक श्री विक्रम कदम सर यांनी करवून घेतली. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम व उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री सुरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश सर, संचालक अभिजीत शेटे सर यांचे प्रोत्साहन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व संगीत शिक्षक यांचे कुपवाड व परीसरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.