करगणी पिडीता प्रकरणी राज्य महिला आयोगाचा पोलीस अधिक्षकांना चौकशीचे आदेश, लोकहित मंचच्या पाठपुराव्याला यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/07/2025 2:24 PM

 सांगली प्रतिनिधी                                           आटपाडी तालुक्यामधील करगणी गावात एक धक्कादायक घटना घडली असून इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या एका मुलीचे लैंगिक शोषण होऊन त्याचे व्हिडिओ तयार करत सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत  मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या राजू गेंड, रामदास गायकवाड, अनिल काळे व रोहित खरात यांच्या त्रासाला कंटाळून सदर मुलीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
       याबाबत चौघांनाही सध्या अटक करण्यात आली असून या घटनेचा लवकरात लवकर तपास होऊन संबंधित आरोपींच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे दूरध्वनीसह निवेदनाद्वारे मागणी केली होती. सदर प्रकरणाची सखोल आणि लवकरात लवकर वस्तुस्थितीदर्शक चौकशी होऊन दोषारोप पत्र दाखल करून सदर अहवाल लवकरात लवकर राज्य महिला आयोगाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या