काल विधान भवन, मुंबई येथे परिवहन मंत्री मा.ना.श्री. प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेऊन जत तालुक्यातील उमदी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नवीन आगार सुरु करण्याची विनंती आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, लोकसंख्या सुमारे २.९२ लाख आहे. सध्या फक्त ६० बसेस असलेला एकच आगार कार्यरत आहे, जो अपुरा ठरत आहे. जतच्या टोकाची अनेक गावे १०० किमीहून अधिक अंतरावर आहेत, शिवाय कर्नाटक सीमेलगतच्या भागात एसटी सेवा उपलब्ध नाही.
यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे, जे असुरक्षित व गैरसोयीचे आहे. तसेच उमदी येथे प्रस्तावित मोठ्या एमआयडीसीमुळे रहदारी वाढणार असून, नवीन आगाराची गरज भासते.
या मागणीला जनतेच्या सोयीसाठी व महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी उद्योग मंत्री मा.ना.श्री. उदय सावंत साहेब देखील उपस्थित होते.