प्राथमिक विद्या मंदिर भगूर शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 10/07/2025 3:49 PM

विद्या मंदिर शिक्षण समिती संचलित प्राथमिक  विद्या मंदिर भगूर शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अनिलाआव्हाड. सौ प्रेरणा ताई बलकवडे श्री नरेंद्र मोहिते हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय अंबादासजी आडके होते प्रमुख अतिथी प्रेरणाताई बलकवडे ,(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर येऊन अभ्यास करावा शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे व पालकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांचे शैक्षणिक व शारीरिक विकासाकडे लक्ष द्यावे असे प्रेरणाताई बलकवडे यांनी पालकांना आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र महाजन सर पाहुण्यांचा परिचय व स्वागत विजया चतुर मॅडम कार्यक्रमास हेमंत काशीकर सर कैलास भाऊ भोर प्रांजली जगताप मॅडम, मनोरमा जगताप मॅडम, विजया चतुर , महेंद्र महाजन सर सौ रूपालीताई उचाडे व सर्व पालक वर्ग उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या