रत्नागिरी नागपुर महामार्ग १६६ हा महामार्ग अंकलीपर्यंत पुर्ण झाला आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूस अंकली हद्दीत साडेचार मीटरची भिंत बांधण्याचे काम कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरु केले होते. आज हे भिंत बांधण्याचे काम बंद पाडण्यात आले.
नॅशनल हायवे ऍथोरटीने हे काम खाजगी एजन्सीला दिले आहे. त्यांनी दोन दिवसापासून या कामास सुरवात केली होती. अशी भिंत बांधल्यास शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जाण्यास मार्ग उरणार नाही. शेतातील माल वाहतूक करणेस मोठी अडचण तयार होणार आहे. जनावरे घेवुन जाणे, ज्यांची घरे शेतात आहेत त्यांची फार मोठी अडचण तयार होणार आहे. खास करुन या परिसरात ऊसाचे बागायती क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याची वहातूक करणे जिकीरीचे होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधण्यात येवु नये अशी आम्ही मागणी करीत आहोत.
हे प्रश्न जेंव्हा संबंधीत अधिकाऱ्यासमोर मांडले त्यावेळी ज्यांना महामार्गावरून येण्याजाण्यासाठी ऍक्सेस हवा आहे त्यांनी साडेतीन लाख भरावेत मगच त्यांना ऍक्सेस ठेवता येईल असे सांगीतले गेले. हा सरळ सरळ शेतकऱ्यांची अडवणूक असुन शेतकऱ्यांच्यावर अन्याय कारक आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणतेही बांधकाम करण्यात येवु नये. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा आम्ही देत आहोत. यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, शाम पिरजादे यांचेसह अंकली, वर्षी, ईनाम धामणी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.