सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांना पकडण्या साठी विशेष मोहीम मा. सत्यम गांधी आयुक्त यांनी राबविण्या साठी आदेश केले आहे ,
आज उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागार्जुन मद्रासी , सहा आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या टीम ने १४ घोडे पकडून कोंडवड्यात ठेवले आहे, घोड्यावर दैनंदिन होणार खर्च वसूल करणे बाबत उप आयुक्त स्मृती पाटील यांनी सूचना दिल्या आहेत, घोडे मालक सदर घोड्याबाबत योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सांगावकर यांनी दिली आहे,
गाई ,कुत्री ,घोडे अन्य जनावरे मोकळे सोडून नागरिकांना धोकादायक ठरणार असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे बाबत मा आयुक्त सत्यम गांधी यांनी सूचना दिल्या आहेत, तिन्ही शहरातील भटक्या जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्याच बरोबर मालकाच्या शोध घेण्यात येणार आहे, कारवाई प्रास्ताविक करण्यात येणार आहे,
मनपा क्षेत्रात भटकी जनावरे सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,मालकावर गुन्हे दाखल करणे बाबत या पूर्वीच सूचना दिल्या आहेत, लक्ष ठेऊन कारवाई करणारच असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.