महाराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या टूर्नामेंट कमिटी मध्ये निलेश शहा यांची वर्णी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/09/2025 5:19 PM

सांगली :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 
टूर्नामेंट कमिटी मध्ये निलेश शहा यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २०२५-२६ या वर्षात होणाऱ्या टूर्नामेंट कमिटी मध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजयजी बजाज यांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करण्यात आला .

         यावेळी निलेश शहा म्हणाले की , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष  रोहित पवार व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजय बजाज  तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अजिंक्य जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मला मिळाली आहे , सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव किशोर शहा व उपाध्यक्ष चंद्रकांत पवार यांचे ही मला कायम मार्गदर्शन असते , तसेच माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण पाडण्याचा व खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा माझा नेहमी असेल असे निलेश शहा म्हणाले .

Share

Other News

ताज्या बातम्या