अवैध रेती उत्खननावर पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई;18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/12/2025 4:18 PM

जागेवरच नष्ट  नांदेड :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली.
या कारवाईत उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, श्रीरामे, रमेश गिरी, मनोज सरपे, महेश जोशी, कल्याणकर, सचिन उपरे, मुंगल, गजानन होळगे, संजय खेडकर आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, जानोळे, हिंगोले यांचा समावेश होता.
कारवाईत जप्त व नष्ट केलेला मुद्देमाल                   गस्तीदरम्यान पथकाला अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी 3 गुडगुडी, 1 इंजिन, 15 तराफे सापडले. मजुरांच्या साह्याने पथकाने 3 गुडगुडी आणि 1 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केले. 15 तराफे जाळून नष्ट केले असा एकूण 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावर जाणूनबुजून पाणी सोडून दिले होते, ज्यामुळे पायी किंवा साध्या वाहनाने पुढे जाणे अशक्य होते. तरीही पथकाने ट्रॅक्टरचा वापर करून उत्खनन पॉईंटपर्यंत पोहोचत कारवाई पूर्ण केली. अवैध रेती उत्खननाविरोधात सक्तीने व सातत्याने कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या