नंबर प्लेट शिवाय वाहन चालवू नका – प्रादेशिक परिवहन अधिकारी विशेष तपासणी मोहिमेत 22 दोषी वाहनांवर कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/12/2025 6:15 PM

नांदेड :-नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा/टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडच्या वायुवेग पथकातर्फे 7 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण 184 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 22 वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, वाहनावर नंबर प्लेट लावल्याशिवाय वाहन चालवू नये, मोटार वाहन कायदा व नियमांचे पूर्ण पालन करणे बंधनकारक आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या