श्री. एकनाथराव शेटे महाविद्यालयात रोटरी क्लब देवळाली कॅम्पतर्फे व्हीलचेअरचे वितरण
शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री. एकनाथराव शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे रोटरी क्लब देवळाली कॅम्प, नाशिक यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले.
रोटरी क्लब विविध सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य व सेवा सातत्याने उपलब्ध करून देत असून, या व्हीलचेअर वितरण उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळाली.
या वितरण प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून श्री. भाऊसाहेब कडभाने, श्री. तुकाराम सहाणे, श्री. सोमनाथ सहाणे, शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे सहकार्यवाह श्री. जितेंद्र भावसार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे तसेच बिटको महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शरद नागरे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान श्री. भाऊसाहेब कडभाने यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी रोटरी क्लब देवळाली कॅम्प तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.