लोकहित मंच व त्रिकोणी बाग हास्य परिवाराने दै. सकाळ च्या "अंधार युग" मालिकेचे केले कौतुक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/12/2025 11:13 AM

  * सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू असून यापैकी नशेखोरीचा धंदा सध्या जोमात चालू आहे. शहरातील अनेक सुनसान जागी या नशेखोरीला ऊत आला असून, या विरोधात दैनिक सकाळने पाऊल उचलत अशा अड्ड्याना चव्हाट्यावर आणलय. यामध्ये पत्रकार शैलेश पेटकर यांचा मोलाचा वाटा असून, या चालू केलेल्या अंधार युग मालिकेचे लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह त्रिकोणी बागेतील हास्य परिवारातील अनेक सदस्यांनी दैनिक सकाळच्या कार्यालयास भेट देऊन संपादक शेखर जोशी यांचा सत्कार केला.
      यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे, त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्वला गुळवणी, सामाजिक कार्यकर्ते किरणराज कांबळे, अमित कांबळे,  ज्योती चव्हाण , आरूणा भगत , शैला लाळगे , कमल दिक्षित , शालन पाटील , कमल आरगे,  आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या