सांगली: शहर जिल्हा फ्रंटल सेल पदाधिकारी व बूथ अध्यक्ष यांची एक महत्वाची बैठक पार पडली. बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार झाली.
यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून शेखर माने यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक प्रभागात लोकांपर्यंत पोहोचून आणि त्यांची मते जाणून योग्य उमेदवार निश्चित करावेत.बैठकीत ठरल्याप्रमाणे पुढील दोन दिवसांमध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून, त्यांचे समर्थक आणि लोकांच्या सल्लामसलतीनुसार उमेदवार निवडण्याचे ठरवण्यात आले असे ते म्हणाले
पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पक्ष पूर्ण ताकदीनं पाठिंबा देईल असे आश्वासन दिले.
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील आरोग्य सेवा, रस्ते, पाणीपुरवठा आणि उद्योग व्यवसायांच्या सुविधा सुधारण्यावर भर देण्याची गरज या बैठकीत स्पष्ट करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली, पक्ष पुन्हा एकदा महापालिकेत अग्रक्रम मिळवण्यासाठी कटीबद्ध आहे असे ते म्हणाले
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , पक्ष प्रदेश निरीक्षक शेखर माने , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,धनपाल खोत, सागर घोडके,हरिदास पाटील, शेडजी मोहिते , विजय घाडगे ,अभिजित भोसले ,मुस्ताक रंगरेज , असिफ बावा ,संजय औंधकर,धनंजय पाटील, डॉ सतीश नाईक ,आयुब बारगिर ,प्रसाद मदभाविकर ,विनायक केरीपाळे ,डॉ शुभम जाधव, उमर गवंडी , शितल खाडे , विद्या कांबळे ,छाया जाधव , अनिता पांगम ,विपुल केरीपाळे ,संगिता जाधव ,अमृता चोपडे , सुरेखा सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.