राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांच्याकइन प्रभाग ८ अ साठी उमेदवारीची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/12/2025 6:25 PM

राष्ट्रवादी अजितदादा पवार गट कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी प्रभाग 8-अ मधून शहरजिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे सर यांच्याकडे उमेदवार मागणी अर्ज केला.


             सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025-26 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी आज प्रभाग क्रमांक 8 मधून अ-अनुसूचित जाती पुरुष या जागे करीता. राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष मा.पद्माकर जगदाळे सर यांच्याकडे उमेदवार मागणी अर्ज जमा केला.
             
             त्यावेळी उपस्थित आमचे आधारस्तंभ माजी नगरसेवक मा.विष्णू माने साहेब, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष मा.बीरेंद्रदादा थोरात, राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष मा.राधिकाताई हारगे, प्रदेश महिला राष्ट्रवादी सरचिटणीस मा.जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हा उपाध्यक्ष मा.वसीमभाई नायकवडी, कुपवाड शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मा.अरुण रुपनर तात्या, विद्यार्थी विभाग शहर जिल्हाध्यक्ष मा.तोहीदभाई फकीर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या