कर्जत-जामखेड मधील अर्धवट स्थितीतील उपजिल्हा रुग्णालयांची कामे पूर्ण करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूदीची पुरवणी मागणी सभागृहात सादर • ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्यसेवेचा लाभ मिळणार विधानपरिषद सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 10/12/2025 6:57 PM

नागपूर (प्रतिनिधी/वार्ताहर) 

        उपजिल्हा रुग्णालय कर्जत, जि.अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील मुख्य इमारत व निवासस्थान बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि उपजिल्हा रुग्णालय मिरजगाव ता.कर्जत, जि.अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील इमारत बांधकाम पूर्ण करण्यासाठी तसेच उपजिल्हा रुग्णालय जामखेड जि.अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील निवासस्थान बांधकाम पूर्ण करण्याकरिता सन 2025-2026 सालासाठी भरीव निधीची तरतूद नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधीत सभागृहात पुरवणी मागणीद्वारे करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि या उपजिल्हा रुग्णालयांमार्फत अधिकाधिक नागरिकांना उत्तम दर्जाची उपचार सेवा प्राप्त व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.   

        100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 44 कोटी 84 लक्ष रूपये इतक्या अंदाजित रकमेपैकी सन 2025-2026 या वर्षासाठी 08 कोटी रूपये रकमेची पुरवणी मागणी  सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन काळात सभागृहात सादर करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे अर्धवट अवस्थेतील निवासस्थान बांधकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजित रक्कम 26 कोटी 84 लक्ष रूपये पैकी 10 कोटी रूपये रकमेची पुरवणी मागणी सभागृहात सादर झालेल्या एकूण पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. 

        त्याचप्रमाणे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील इमारत बांधकाम पूर्ण करणे या कामासाठी 13 कोटी 64 लक्ष रूपये इतक्या अंदाजित रकमेपैकी सन 2025-2026 सालासाठी 04 कोटी रूपये रकमेची पुरवणी मागणी सभागृहात सादर करण्यात आली आहे.  

        100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय जामखेड, जि. अहिल्यानगर येथील अर्धवट अवस्थेतील निवासस्थान बांधकाम पूर्ण करणे या कामासाठीच्या अंदाजित 26 कोटी 84 लक्ष रूपये पैकी 09 कोटी रूपये रकमेची पुरवणी मागणी सभागृहात सादर झालेल्या एकूण पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
    
        कर्जत-जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला पाठबळ दिल्याबद्दल सभापती महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत. ही अर्धवट कामे आता तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालना मिळणाार असल्याने कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
*****

प्रति,
मा. संपादक/वृत्तसंपादक
कृपया उपरोक्त बातमीस आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक/प्रिंट माध्यमाद्वारे ठळक प्रसिध्दी देण्यात यावी, ही विनंती.

आपला,

(निलेश मदाने)
मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे जनसंपर्क अधिकारी

Share

Other News

ताज्या बातम्या