पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांनी सयुक्त कारवाई करूण कौठा येथील मंगळवार बाजाराचे केले स्थलांतर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/12/2025 6:23 PM

नांदेड :-  दिनांक 09/12/2025 रोजी कौठा मेन रोडवरील वाहतुक कोंडी, स्वच्छता व सुविधांच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेत पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांचे संयुक्त पुढाकारातुन आठवडी बाजाराचे यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले.

मागील काही महीन्या पासुन परिसरातील रहीवाशी, व्यापारी व नागरीकाकडुन वाहतुक नियोजन, पादचारी सुरक्षा स्वच्छता आणि अतिक्रमण याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याचा योग्य तो विचार करूण महापालिकेने पर्यायी ठिकाण निश्चित केले असुन त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या सहकार्याने आज सकाळी बाजारातील सर्व दुकानदारांचे शांततापुर्ण व व्यवस्थीत स्थलांतर करूण सदर बाजार साई बाबा कमान मधुन वसरणी रोडवर बसविण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीन येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, बाळासाहेब रोकडे, पोउपनि ज्ञानेश्वर भोसले, पोहेकॉ/गणेश वाघमारे, बालाजी दंत्तापल्ले, श्याम भोसले, शेख अनवर तसेच महापालीका अधीकारी अतिरीक्त कमीशनर गिरीष कदम, उप आयुक्त अजीतपालसिंग संधु, सहाय्यक आयुक्त सिडको झोन मिर्झा परतुल्ला बेग, सहाय्यक आयुक्त रावन सोनसळे, अग्नीशामकचे अधिकारी फेरोजी दासरे व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या सहभाग नोंदवुन पुर्ण केली आहे.

सदर कारवाई दरम्यान सर्व व्यापा-यांनी, नागरीकांनी पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे स्थंलातराची प्रक्रिया सुरळीत रित्या पार पडली असल्याने प्रशासनाने सर्वाचे अभार मानले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या