*मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित पदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 30/11/2021 8:00 PM

*जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार व आमदार राहणार कायम निमंत्रित सदस्यपदी*

*मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या  झालेल्या बैठकीत निर्णय*

*मार्कंडा  देवस्थानच्या विकासाला मिळणार गती*

*विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन*

*दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ गडचिरोली*

*विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिक खासदार व आमदार यांची निवड करण्यात आली असून या निवड बद्दल गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार अशोकजी नेते व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे अभिनंदन केले आहे.*
*मार्कंडा देवस्थान चे मंदिर मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीकरिता खुले करण्यात आले असून अजून पर्यंत काम पूर्ण नाही.त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या थांबलेल्या कामाला गती मिळावी व मार्कंडा देवस्थान च्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष लक्ष राहावे या हेतूने मार्कंडा देवस्थान ट्रस्टने जिल्ह्याचे पालकमंत्री , स्थानिक आमदार व खासदार यांची कायम निमंत्रित सदस्य पदी निवड केली आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या