माननीय देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
विषय=- आटपाडी तालुक्यातील करगणी मधील मुली वरील लैंगिक अत्याचाराची व आत्महत्येची चौकशी होण्याबाबत
महोदय,
आटपाडी तालुक्यामधील करगणी गावात एक धक्कादायक घटना घडली असून इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या एका मुलीचे लैंगिक शोषण होऊन त्याचे व्हिडिओ तयार करत सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या राजू गेंड, रामदास गायकवाड, अनिल काळे व रोहित खरात यांच्या त्रासाला कंटाळून सदर मुलीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत दोघांना सध्या अटक करण्यात आली असून दोघेजण फरारी आहेत परंतु या घटनेचा लवकरात लवकर तपास होऊन संबंधित आरोपींना अटक करत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. कारण याआधीही काही मुलींच्या बाबतीत असे घडल्याचे बोलले जात आहे. करगणीतील स्टॅन्ड जवळ असणाऱ्या बेकरीच्या अडून हे सारे प्रकार केले जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या सबंध प्रकरणाचा पक्षपातीपणे तपास होऊन पोलिसांनाही तसे आदेश द्यावेत.
खरे तर या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीलाच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते परंतु लोकांचा रेटा वाढल्या नंतर पोलिसांनी तो दाखल केला. करगणी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रकार होत असतील तर पोलिसांची याबाबतीतली भूमिका ही संशयास्पद वाटते. त्यामुळे सदर प्रकरणाचा सखोल आणि निपक्षपाती तपास व्हावा व संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.
*आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील मुली वरील लैंगिक अत्याचार व तिच्या आत्महत्ये संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी आज लोकहित मंच सांगलीच्या वतीने मागणी केली*
* मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली