संपूर्ण युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप :- प्रा. हेमंत चोपडे
भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने स्वा. सावरकर जन्मठिकाण भगूर येथे स्वा.सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेल्या साहसी उडीला ११५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास लेखक कवी श्री हेमंत चोपडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी मृत्युंजय कापसे, कैलास गायकवाड यांनी ही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज कुवर यांनी केले.
यावेळी चोपडे सर मार्गदर्शन करतांना सांगितले कि, लंडनमध्ये स्वा. सावरकरांना अटक होणे, स्वा. सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणे आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणे, या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० या दिवशी मोरिया बोटीतून समुद्रात धाडसी उडी मारली आणि ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या संघर्षांची लाट जगाच्या कानाकोपर्यात पोचली. जिवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच, त्याशिवाय त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची रणदुदुुंभी जगामध्ये निनादली !
या धाडसामागे स्वा. सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला, तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी. याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळे राहून अन्य देशांत अखंडपणे कारवाया करायच्या होत्या. ब्रिटिशांच्या कैदेत अडकून राहिल्यास स्वातंत्र्यलढ्यात खंड पडेल आणि देशाचे स्वातंत्र्य लांबणीवर जाईल, याच विवंचनेतून त्यांची ती ‘समुद्रझेप’ होती. तो पळपुटेपणा नव्हता; तर तो एक डावपेच होता. ते एक मोठे धाडस होते.
यावेळी समूहाच्या वतीने मृत्युंजय कापसे यांनी चोपडे सरांचा सावरकरांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनोज कुवर यांनी केले तर आभार भूषण कापसे यांनी मानले.
भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने सकाळी १० वाजता भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस श्री हेमंत चोपडे यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस प्रसाद आडके व श्री चंदु नाना गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले, त्यानंतर सावरकर स्मारकात कैलास गायकवाड यांनी सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला, या वेळी प्रशांत लोया, विजय घोडेकर, शरद करंजकर, सुनिल जोरे, प्रमोद घुमरे, संभाजी देशमुख, प्रवीण वाघ, मंगेश बुरके, आशिष वाघ, गणेश राठोड, निलेश हासे, रोशन चौधरी, खंडू रामगडे आदी उपस्थित सावरकर प्रेमी.