सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील बाजार हात गाडीवाले भाजीवाली यांच्यावर जसं हॉकर्स झोन नो हॉकर्स झोन याबाबत कामकाज चालू आहे त्याचे कौतुकच आहे
मात्र रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करणे मनपाच्या जागेवर अतिक्रमण करणे बेकायदेशीर पार्किंग कब्जा करणे पार्किंग न सोडणे किंवा पार्किंग साठी सोडलेल्या जागेवर अन्य उद्योग करणे असे व्हाईट कॉलर चुकीचे काम करणारे यांच्यावर मात्र महापालिका कारवाई करताना कुचराई करते असेच म्हणावे लागेल.
आम्ही मा आयुक्त सत्यम गांधी साहेबांना विनंती केली होती त्यानुसार त्यांनी काल कारवाईचे आदेश दिले आहेत असे स्थानिक वृत्तपत्रातून वाचल आहे या भूमिकेचे स्वागत आहे लवकरात लवकर बेकादेशीर पार्किंग वर हातोडा घालावा त्याच सुद्धा आम्ही स्वागतच करू.
नगररचना अधिनियमातील तरतुदीचा गैरफायदा घेऊन मनपा नगरचना विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगणमत करून असे सगळे प्रकार घडत आहेत याच्यावर सुद्धा आपण वॉच ठेवावा व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा