ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जिल्हा परिषद गडचिरोली चे कार्यकारी अभियंता यांची विभागीय चौकशी करून कार्यवाही करा - राजेश नाथानी*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 12/1/2021 9:53:55 AM

गडचिरोली :-

                    बहुचर्चित कोंदावाही गुमळी स्लॅब ड्रेन बांधकामाचे नियमबाह्य देयके पारित केल्यामुळे जिल्हा परिषद गडचिरोली चे कार्यकारी अभियंता यांच्याविरुद्ध तात्काळ विभागीय चौकशी प्रस्तावित करून कार्यकारी अभियंता या पदाचे अतिरिक्त प्रभार तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी भारतीय माहिती अधिकार न्यूज नेटवर्क गडचिरोलीचे तालुका प्रतिनिधी राजेश नाथानी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांना निवेदनातून केली आहे.
                  सदर कामाचे पास झालेल्या बिलाचे मेजरमेंट हे माहे जून 21 ते जुलै 21 काळात एम बी मध्ये नोंदविणे आवश्यक होते. परंतु सदर कामाचे मोजमाप कोणत्या अभियंत्याने रेकॉर्ड केले? व तपासणी करणारे उपअभियंता कोण? विहित मुदतीत सदर कामाचे टेस्ट रिपोर्ट व क्वालिटी कंट्रोल टेस्ट रिपोर्ट आले नाही. तर मग या कामाची गुणवत्ता कोणी ठरविली? सदर काम विहित मुदतीत पूर्ण न होता साधारणता 19 महिने उशिरा पूर्ण झाले असून सुद्धा या कामाकरिता मुदतवाढ देण्यात आली नाही. ज्यामुळे नियमांची पायमल्ली व शासनाच्या महसूल बुडविण्यास जिम्मेदार कोण? सदर काम जुलै 21 ला पूर्ण झाल्यास ग्रामपंचायत कोंदावाहीला 100 टक्के निधी जुन्या मेजरमेंट बुक नुसार कोणाच्या आदेशाने देण्यात आले?
                    सदर कामाचे बिल मेजरमेंट हे जुन्या एम बी प्रमाणे अंतिम देयकाप्रमाणे देण्यात आलेले आहेत. तर मग अभियंता चलाख व उपअभियंता चवंडे यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही का करण्यात आली? नियमाविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी विद्यमान कार्यकारी अभियंता हेच जबाबदार दिसून येत असून त्यांची सुद्धा संगमनत दिसून येत असल्याचे म्हटल्यास हरकत नाही. सदर प्रकरण हे गंभीर असून याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सदर निवेदनाची प्रत प्रधान सचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई, आयुक्त नागपुर, जिल्हाधिकारी गडचिरोली, जि.प. अध्यक्ष गडचिरोली, जि. प. उपाध्यक्ष गडचिरोली, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविन्यात आली आहे.

Share

Other News