अन्यथा मनपा प्रशासनाविरोधात झोपमोड आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/10/2023 11:08 AM

प्रति 
मा.आयुक्त 
      सा.मि.कु 
. महानगरपालिका

विषय :- सांगली कोल्हापूर रोड येथील स्ट्रीट लाईट बसवणे बाबत ....

महोदय ,

महापालिका प्रशासन जागे कधी होणार..? अजून किती जणांचे जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार..?

आज दि.०२/१०/२०२३ रोजी रात्री ११:२०च्या सुमारास साधना पेट्रोल पंपावर एका चारचाकी गाडीने दुचाकी व चारचाकी वाहने उडवून दोघांना गंभीर जखमी करून पळून गेला आहे.सदर ठिकाणी कायमचा अंधार आहे.याबाबत मनपा प्रशासनास  यांना वारंवार कळवूनही त्यावर काही कार्यवाही केली नाही.तसेच रस्त्या रोको आंदोलन केले होते त्यावेळी स्ट्रीट लाईट व प्रत्येक चौकात रेड सिग्नल बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते तरीही ह्या सुस्त प्रशासनाला जाग येत नाही.तरी याबाबत तत्काळ स्ट्रीट लाईट ची व रेड सिग्नल ची  सोय करण्यात यावी अन्यथा आम्हाला 
मनपा प्रशासन विरोधात झोप मोड आंदोलन करण्यात येणार आहे.

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या